महापुरुशांबद्द्ल सन २०१७ च्या जनतेमधील गैरसमज

 महापुरुशांबद्द्ल  सन २०१७ च्या जनतेमधील गैरसमज 

तोफेसारखी ब्लॉगची पहिल्या पानाची सुरुवात ........... 
( पूर्ण वाचा आणि आचारण करा ) 

संत तुकाराम महाराज,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज ,राजमाता जिजाऊ,तत्त्वज्ञानी राणी अहिल्याबाई होळकर,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,माता रमाई,महात्मा जोतीराव फुले,राजश्री शाहू महाराज,संत गाडगेबाबा .साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही जात-पात,धर्म,वर्ण-रंग न पाहता आपल्या सर्वाना समाजामधील अनिष्ठ रूढी  - परंपरा,अज्ञान,अंधश्रद्धा,गुलामगिरी,जातीभेद दूर करण्यासाठी आपले संम्पूर्ण आयुष्य खर्ची केले. संत तुकाराम महाराज यांनी त्यावेळच्या समाज कर्मठाना विरोध आपल्या अंभग , गाथा मधून करायचे आणि त्याच समाज कंटक भटानी " हे स्वर्ग - नरक सर्व व्यर्थ आहे " असे लिहून ठेवणाऱ्या जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना वैकुंठास अर्थात स्वर्गलोकी पाठविले  म्हणे त्यावेळी  पुष्पकयान गरुडरुपी आले. त्यावर आपल्या भोळ्याभाबड्या समाजाने विश्वास ठेवला. 
          संत तुकाराम महाराज यांनी त्यावेळच्या समाज कर्मठाना विरोध आपल्या अंभग , गाथा मधून करायचे आणि त्याच समाज कंटक भटानी " हे स्वर्ग - नरक सर्व व्यर्थ आहे " असे लिहून ठेवणाऱ्या जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना वैकुंठास अर्थात स्वर्गलोकी पाठविले  म्हणे त्यावेळी  पुष्पकयान गरुडरुपी आलेत्यावर आपल्या भोळ्याभाबड्या समाजाने विश्वास ठेवला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगगामधून त्यावेळी समाजामधील कर्मठ,भटाना त्यांच्या अनिष्ठ रूढी-परंपरा यांच्याविरुद्ध बंड पुकारले होते ते सर्व अभंग त्यावेळी मंबाजी ,रामेश्वर भट्ट यांनी इंद्रायणीच्या नदीमध्ये बुडविले आणि ते अभंग तेली जातीच्या जगनाळे महाराज यांनी लिहून काढले याच रागामध्ये भटांनी नवीन म्हण काढली कि , “ सकाळी सकाळी तेल्याचे तोंड ओआहू नये अपशकून होतो ” ( खून कि वैकुंठगमन क्रमशः ).  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मेला कि मारला  कळेना । यांसाठी लिहिले आहे कि  “ मारला कळेना । म्हणती वैकुंठास गेला । “  असा संकेत केला आहे.
     अखंड स्वराज्य भूमीचे आराध्य दैवत,बहुजनप्रती पालक, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली हि स्वराज्य भूमी मुघलसाम्राज्या पासून स्वतंत्र व्हावी म्हणून त्यांनी पुढाकार घेतला.त्यावेळी त्यांच्या विरोधाला राज्यभिषेकापासून ते राजांच्या मरणापर्यंत त्यावेळचे भट-ब्राम्हण, जनतेमधील काही कर्मठच होते. मग तेही भूमिपुत्र मग त्यांनी का विरोध केला याचा शोध त्या स्वयंघोषित शिवशाहीर बाब्या पुरंदरे यांनी का नाही लावला? फक्त इतिहासाची विकृतीकरण करून प्रत्येकवेळी भट-ब्राम्हणानी काय केले याचा खोटारडेपणा इतिहासामध्ये घुसवला. शिवाजी महाराज हे अखंड जनतेचे राजे रक्षणकर्ते होते म्हणून राजांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये मुठभर मावळे घेवून लाखोंच्या मुघलांना पळवून लावले आणि स्वराज्य निर्माण केले.मग त्यावेळच्या जनतेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहत होती. ( क्रमश: विषप्रयोग कि नक्की काय?)
      शिवपुत्र संभाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यासाठी असे बलिदान दिले, त्याचे वर्णन केले तरी असे वाटते कि, तत्काळ तोडून टाकावेत हाथ त्या मुघलांचे. इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक  संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा  गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी शास्त्री या भटाच्या सहाय्याने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. त्यांचे अतोनात हाल करून ,त्यांचा छळ करून मारले. संभाजी राजांनी महाराजांच्या खुनाचा बदला घेतला. बुद्धभूषण हा ग्रंथ लिहणाऱ्या त्यावेळी समाज कंटक- भटानी बाईल वेडा ठरविला होता . त्यांच्या म्रृत्यूमागेही ह्याच लोकांचा हाथ आहे असे आजच्या काळापर्यंत अनेक लेखक होवून गेले कि मारले हा एक प्रश्न ?  
          पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला तुंगांपासून  वाचवले. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.. ही भारतातीलमाळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या  'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरीइंदूरच्या दक्षिणेससलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यावेळी पुण्यश्लोक राणी अहिल्याबाईना विरोध करणारे हे पेशवे – भट होते असे इतिहासामध्ये नमूद आहे.तरीही राणी अहिल्याबाई यांनी नेतृत्व क्ररुन त्या समाज कंटकांना धुडकावून लावले आणि अगदी मरणापर्यंत साम्राज्य टिकविले. त्यावेळच्या समाजामध्ये अनेक जाती-धर्माची लोक राहत होती.
          महात्मा जोतीराव फुले यांनी पहिली शिवजयंती साजरी केली. जून इ.स.१८६९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पहिला पोवाडा लिहिला. महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले.  समाजाचे अज्ञान, दारिद्‌र्‍य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली.जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. महात्मा फुले हे थोर नेते होऊन गेले आहे. त्यांनी मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली.(संकलन )
             खरेखुरे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे असतानासुद्धा  यांनी जगभरातील अनेक भाषामध्ये जगाला शिवरायांचे महत्त्व पटवून दिले. भारताचे तथाकथित स्वातंत्र्य त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ ला मुंबई मध्ये वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, " ये आझादी झुठी है,देश कि जनता भूखी है! . त्यावेळच्या जातीच्या खालीपणामुळे,वैयक्तिक दुख न पहाता अण्णाभाऊ नी लोकांना प्रबोधन केले ते खरे लोकशाहीर होते . लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्‍याचोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली. सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले.
           विश्वरत्न,भारतीय राज्यघटनेचे ,कायदेतज्ञ  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरजू,शिक्षणापासून वंचित असलेल्या साठी तसेच समाजाची गुलामगिरीमधून सुटका व्हावी यासाठी खर्ची केले. भारत देशाच्या संविधानाची निर्मिती केली.  कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शिर्ष १०० विद्वानांची यादी तयार तयार केली त्यात त्यांनी प्रथम स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठेवून त्यांना जगातला नंबर १ महाविद्वान म्हणून त्यांचा गौरव केला. प्राध्यापक एडविन सेलिग्मन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचं सखोल ज्ञान ऐकून होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गौरवपर उद्गार काढले, ते म्हणाले, " भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत." डॉ.बाबासाहेब यांनी संविधान लिहिताना सर्व गोष्टींचा विचार केला होता . संपूर्ण जाती व्यवस्थेचा अभ्यास केला होता. डॉ.पंजाबराव देशमुख यांनी या संदर्भात अनेक भाषणे आणि लेख लिहिले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर स्वतास कोणत्याही जाती-  धर्माचा न म्हणवता अखेरीपर्यंत “ भारतीय ”  म्हणून संबोधले ( क्रमशः)           
               हे वरील सर्व थोडक्यात मि लिहिले आहे. याचे उर्वरित पानावर आपणास अभ्यास करावयास मिळेल.आजच्या सन २०१७ च्या समाजामध्ये कोणी जय शिवराय म्हटले कि, तो मराठ्याचा , जय भीम म्हटला कि तो बौद्ध असे मानतात . अशा सर्व संकल्पना आजचे जातीयवादी इतिहासकार, सत्ता स्थापनेसाठी मतांचे राजकारण करणारे राजकारणी यांच्या प्रक्षोभक भाषणास बळी पडणाऱ्या जनतेमुळे होत आहे. अखंड सत्य इतिहास साक्ष आहे कि, संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु आहेत त्याचप्रमाणे या दोघांना महात्मा जोतीराव फुले यांनी गुरु मानले आणि समाजामध्ये क्रांती केली. महात्मा जोतीराव फुले यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानले होते . शाहू महाराज यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली होती मग या सर्व महापुरुषांची जात कोणती होती ? हे महापुरुष स्वतच्या आयुष्यामध्ये काहीना काही असे करून गेले आहेत ज्यामुळे तुम्ही आम्ही जगत अथवा जिवंत आहोत असे म्हणेन .आता या माझ्या लेखामधून  तेढ निर्माण करणाऱ्या भट आणि त्यांच्या जोडीचे कर्मठ लोकांना चपराक आहे .

शब्दांकन / लेखक -भाई अमोल गायकर

जनहक्क चळवळ

अखिल भट विरोधीसामाजिक विचारमंच  संपर्क – ८८९८५४५०७०     

1 comment:

  1. ज्यांनी ही पोस्ट वाचली त्यांनी कृपया ही पोस्ट शेअर करावी

    ReplyDelete