लेखणी परिवर्तनाची, एका निर्भीड पत्रकाराची

लेखणी परिवर्तनाची, एका निर्भीड पत्रकाराची
( संदर्भ - माझा प्राण लेखणी )

प्रिय वाचकहो ,              आपल्या राज्यामधील अहमदनगरच्या कोपोर्डी गावामध्ये बुधवारी १३ तारखेला जे घडले ते संपूर्ण राज्याला नव्हे तर देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया घटनेची पुनरावृत्ती आहे. अजूनहि नववीत शिकणारी मुलगी वय अंदाजे १५ वर्ष , शाळेमधील खेळाडू वृत्तीची आणि मनमिळाऊ. तिला चार नराधमांनी अत्याचार करून हालहाल करून ठार केले. तिच्या त्या अवस्थेचे वर्णनहि करू शकत नाही. महाराष्ट्र राज्याचे गृहखाते माननीय मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ह्यांचेकडे आहे आणि मुख्य म्हणजे माजी ग्रामीण गृहमंत्री आणि पालकमंत्री राम शिंदे  ह्यांच्या जिल्ह्यामध्येच अशा घटना घडणे म्हणजे गृह्खात्याला न शोभणारी लाजिरवाणी गोष्ट आहे. जो स्वताच्या जिल्ह्याचे प्रशासन सांभाळू शकत नाही असला राज्य गृहमंत्री वा रे! म्हणजेच आपल्या मानेवर सुरी म्हणायची. काही न्यूज वाहिनीनी हि बातमी दाखवली तर काहीनी लाइव्ह सभा घेतली. काही जातीयवादी आणि राजकारणाचे मुख असलेले न्यूज वाहिनी काहीच दाखविले नाही . आवाज नाही उठवला अशांचा मी निषेध करतो. आपल्या देशामध्ये एक स्त्री मोकळे जीवन जगू शकत नाही हे सत्य आहे. कारण दिलीतल्या निर्भया प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. आणि सरकार म्हणतेय कायद्यामध्ये सुधारणा झालीय. हे फक्त राजकारण्यांच्या संरक्षणामुळे आताच बघा ह्या प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ ह्या नराधमाचा फोटो राम शिंदे बरोबर आहे असा विरोधी पक्षनेते यांनी सादर केला आहे आता बघू अधिवेशनामध्ये हा मुद्दा कसा बोलवून घेतला जाईल. विषय नाहीच निघाला कि समजून जा एका माळेचे मनी .     “बेटी बचाओ बेटी पढाओ”  हे आंदोलन गेले किती वर्ष धूळ खात पडले आहे . त्यावर अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी नावे नोंदणी करून प्रमाणपत्राचा फक्त ओळखपत्रासाठी उपयोग करण्यासाठी केला आहे . अरे ! छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची पूर्ण जग पूजा करते त्यांच्या जन्म , कर्मभूमी या त्यांच्या निर्माण केलेल्या स्व्रराज्यामध्ये अशा घटना घडणे म्हणजे त्यांचा घोर अपमान आहे. माननीय पंतप्रधान ह्यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीला श्रींचा आशीर्वाद म्हणून प्रचार केला आणि दिल्लीमध्ये विसरले. पण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आशीर्वादामुळे निवडून आले त्यांचे कायदे आमलात आणले असते तर असे प्रकरण पुन्हा दिसले नसते . अरे आठवा महाराजांच्या इतिहासामधील कधी एका स्त्री वर अत्याचार झाला नाही मग ती स्त्री कोणत्याही जाती धर्माची असू दे नाहीतर दुश्मनच्या घरातील असो म्हणून  म्हणतात पालनकर्ता. त्यांचेच विचार चालवणारे आपल्या देशाचे संविधान शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही . त्या जातीयवादि इतिहासकारांनी आपल्या पद्धतीने फक्त स्वताच्या प्रसिद्धीसाठी आणि धनासाठी आपापल्या पद्धतीने आणि राजकारण्याच्या आशीर्वादाने महापुरुषांच्या कथा मांडल्या. या राजकारन्यांची सुरवात जाती-धर्मापासून आणि शेवटहि तोच. त्यामुळे आजच्या आधुनिक जगातील सुशिक्षित युवक हि यांच्यामध्ये गुरफटला जातो.   आता हे बघा १३ तारखेपासून काही जातीयवादी संघटना फेसबुक, व्हाटस अप आणि अन्य शोशल मिडीया द्वारे एक मेसेज फिरवत आहे कि मराठा मुलीवर एका दलित नराधमांनी अत्याचार केला. मोर्चा काढा . या जातीयवाद्यांना एक सांगणे आहे कि, ज्या महापुरुषांच्या नावावर आपण संघटना चालवता त्यांचे विचार असे नाहीच मग हा त्यांचा घोर अपमान आहे. याअगोदर दलित मुलीवर अत्याचार झाला त्यांचे संबधित संघटनांनी राजकारण केले . अरे ! जातीयवाद्यानो ज्यांचे विचार सांगता निदान त्यांचा सन्मान बाळगा . आज त्या महापुरुषांनी इतिहास घडविला म्हणून तुम्ही जीवन जगत आहात. आता अशा घटनावरहि जाती-धर्माचे राजकारण करून काय दाखवू इच्छिता . तुम्हाला फक्त तुमच्या संघटनेच्या नावाची आणि तुमच्या पदाची प्रसिद्धी हवी आहे. आपल्या राज्यामध्ये स्त्री सुरक्षित नाही मग ती कोणत्याही जाती धर्माची असो , हा मुद्दा घेऊन लढा द्याना. बिचाऱ्या पिडीत स्त्रीच्या घरातील व्यक्ती आधीच दुखामध्ये असते आणि त्यामध्ये तुम्ही त्यांना निस्वार्थी पणे पाठींबा देवून न्याय मिळवून न देता राजकारण करता त्यामुळे त्यांचे जीवन नकोसे आहे अशी अवस्था आहे . एकदा तरी तिचा विचार करा कि स्त्री कोणत्याही जाती धर्माची नाही फक्त आपली बहीण आहे आणि द्याना तिला न्याय मिळवून असे माझे म्हणजे मी अमोल गायकर आपणांस खुले आव्हान करत आहे. तरुणानो कृपा करून ह्या जातीपातीच्या राजकारणाच्या दलदलीमधून बाहेर पडा . या गुलामीतून बाहेर पडा आणि विकास करणाऱ्या निस्वार्थी चळवलीमध्ये कार्यरत व्हा. अहमदनगर मधील अत्याचार घटनेचा मी निषेध करीत आहे. त्या पिडीत तरुणीला आणि त्यांच्या घरातल्या व्यक्तींना न्याय नाही मिळाला तर आमचा लढा सुरु राहील. कायद्यामध्ये सुधारणा होईपर्यंत माझ्या हातामधील लेखणी थांबेपर्यंत माझा लढा असेल. क्रांती हि घडणारच मग मी एकटा असेन नाहीतर माझ्याबरोबर १० लोक असतील. माझा लढा जाती-पातीच्या राजकारणाविरुद्ध असेल.जय क्रांती ! जय पत्रकारिता

लेखक / शब्दांकन
→भाई अमोल  गायकर (PASS)


   

No comments:

Post a Comment