भारताचे संविधान

भारताचे संविधान

प्रास्तविका

आम्ही भारताचे लोक,भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस :
सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय ;
विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ;
दर्जाची व संधीची समानता ;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आंनी एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे सविंधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतप्रत अर्पण करत आहोत.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते आणि त्यांना ही कुशाग्र बुद्धी आणि तल्लख स्मरणशक्ती ईश्वरदत्त नव्हे तर आपल्या प्रचंड मेहनतीने मिळाली होती.इ.स. १९१२ मध्ये बी.ए.इ.स. १९१५ मध्ये डबल एम.ए.इ.स. १९१७ मध्ये पी.एचडी.इ.स. १९२१ मध्ये एम.एस्‌‍सी.इ.स. १९२२ मध्ये बार-अॅट-लॉइ.स. १९२३ मध्ये डी.एस्सी.इ.स. १९५२ मध्ये एल्‌एल.डी.इ.स. १९५३ मध्ये डी.लिट् आणि इतर अशा सर्व मिळून एकूण ३२ पदव्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपादन केल्या होत्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ २० व्या शतकातील सर्वात बुद्धिमान भारतीय होते असं नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील सर्वाधिक बुद्धिमान व्यक्ती आहेत. २० व्या शतकात जगभरात अनेक प्रचंड बुद्धीचे व्यक्ती होऊन गेलेत त्यातही बाबासाहेब नाव अगदी सर्वात वरच्या स्थानावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नुकतेच जगातील सर्वात महान प्रतिभावंत (बुद्धिवंत) म्हणून इंग्लडच्या केब्रिज यूनिवर्सिटीने घोषित केले आहे. त्यांनी बाबासाहेबांवर संशोधन केले आणि त्यातून समोर आले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तब्बल ६४ विषयांत मास्टर होते. आणि एवढ्या संख्येच्या विषयांवर प्रभुत्व असणार्‍या बाबासाहेबांच्या नंतर त्यांच्या जवळपासही कुणाची प्रतिभा किंवा एवढ्या विषयांत प्रभुत्व नाही. जागतिक इतिहासात सर्वात जास्त ज्ञानसंपन्न मनुष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. सिम्बॉल ऑफ नॉलेज (ज्ञानाचे प्रतिक) म्हणूनही बाबासाहेबांचा गौरव केला जातो.


 संकलन  
भाई  अमोल गायकर 
for more information Google 


No comments:

Post a Comment